खानापूर : खानापूर तालुक्यामध्ये आतापर्यंत 63 हजार जणांना कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी संजीव नांद्रे यांनी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे.
खानापूर तालुक्यामध्ये कोरोनाच्या दुसरा लाटेमध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे तालुक्यात लसीकरणाचा वेग वाढवावा अशी मागणी करीत खानापूर तालुका युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकारी नांद्रे यांची भेट घेतली. यावेळी नांद्रे यांनी राजश्री शाहू महाराज नगर येथे सुरू असलेल्या लसीकरण कार्यक्रमांच्यावेळी आतापर्यंत 63 हजार लोकांना लसीकरण देण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे यामध्ये ज्यादातर 45 वर्षांहून अधिक वर्ष लोक अधिक असून येणाऱ्या काळात अठरा वर्षांवरील सर्व लोकांना कोरोना लस देण्यासाठी तालुका आरोग्य विभागाचे प्रयत्न असणार आहेत. नागरिकांनी मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न ठेवता प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा अशी माहिती दिली.
यावेळी युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी येणाऱ्या काळात शाळा व महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्यामुळे 18 वर्षीय विद्यार्थ्यांनाही देण्याची सोय करावी अशी मागणी केली. यावेळी सचिव सदानंद पाटील, नगरसेवक लक्ष्मण मादार, किशोर हेबाळकर, सचिन साळुंखे, गोपाळ पाटील, विनायक सावंत आदी उपस्थित होते.
…..
प्रतिक्रिया
खानापूर तालुक्यात आतापर्यंत किती लोकांना लस देण्यात आली आहे तसेच पुढील भागात किती लोकांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी घेतली. यावेळी लसीकरणाचा वेग होण्याची गरज असल्याचे दिसून आले आहे येणाऱ्या काळात जास्त मिळावी यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती आरोग्याला करण्यात आली आहे.
सदानंद पाटील, सचिव, युवा समिती