तेऊरवाडी (एस. के. पाटील) : साहित्य रत्नं हा वाँट्सअँपच्या माध्यमातून कार्यरत असणारा चंदगड तालुक्यातील साहित्यिकांचा समुह आहे. या समुहाच्या माध्यमातून साहित्य सेवेसोबतचं काही सामाजिक उपक्रम राबवले जातात. म्हणून आज वटपौर्णिमेचे औचित्यसाधून या साहित्यिक समुहामार्फत वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला.
कोरोना स्थितीचा अंदाज घेत प्रत्येक साहित्यिकाने व नैसर्गिक हिताचा विचार करणाऱ्या तालुक्यातील प्रत्येकांने आपआपल्या घरी वृक्षारोपण करून हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पाडला. तसेच या वृक्षारोपण सोहळ्यात सहभागी निसर्गप्रेमींना साहित्य रत्नं परिवारामार्फत पुस्तक भेट देऊन वाचन चळवळ समृद्ध करण्याचा सुद्धा मानस आहे.
चंदगड हा नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध समजला जाणारा तालुका आहे. हाच तालुका अधिक हिरवागार करावा व निसर्गाची सेवा करावी हाच एकमेव उद्देश यामागे होता.
हा उपक्रम पार पाडण्यासाठी संजय साबळे, के.जे. पाटील, प्रमोद चांदेकर, कवी बी. एन. पाटील, राहुल नौकुडकर, विजया उरणकर, कार्तिक पाटील, राजेंद्र शिवणगेकर, अर्जुन मुतगेकर, राजकुमार पाटील, लखन पाटील, गौरव पाटील, आनंद पाटील व साहित्य रत्नं परिवारातील सदस्यांनी विशेष सहकार्य केले.
सद्यस्थितीचा अंदाज घेता असे समाजहिताचे उपक्रम गरजेचे आहेत. म्हणून हा उपक्रम कौतुकास्पद समजला जात आहे.