Sunday , July 26 2026
Breaking News

लैला शुगर्सतर्फे शेतकऱ्यांची थकीत बिले देण्यास सुरुवात

Spread the love

खानापूर युवा समितीच्या पाठपुराव्याला यश

बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पाठपुराव्यामुळे लैला शुगर्सतर्फे शेतकऱ्यांची थकीत बिले देण्यास सुरुवात करण्यात आली असून दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर 80 लाख रुपयांची बिले जमा करण्यात आली आहे तर येत्या दोन दिवसात चार कोटींची बिले दिली जातील अशी माहिती युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना कारखाना व्यवस्थापनातर्फे देण्यात आली आहे.
जानेवारी महिन्यापासून पाठवण्यात आलेल्या ऊस गेले गेल्या सहा महिन्यापासून देण्यास लैला शुगर कडून टाळाटाळ करण्यात येत होती याची माहिती मिळताच काही दिवसांपूर्वी युवा समितीच्या पदाधिकारी जाऊन कारखान्याचे व्यवस्थापन अधिकारी सदानंद पाटील यांना विचारले होते तसेच वेळेत जमा न केल्यास कारखान्यासमोर शेतकऱ्यांचा मोर्चा करून आंदोलन करण्याचा इशारा समितीतर्फे देण्यात आला होता त्यानंतर ही बिले आज जमा करतो उद्या जमा करतो असे सांगून बिले देण्यास टाळाटाळ केली जात होती त्यामुळे आठ दिवसापूर्वी जाऊन पदाधिकाऱ्यांनी पुन्हा बिले द्यावी अशी मागणी केली होती मात्र कारखाना व्यवस्थापनाकडून कोणतीच माहिती देण्यात आली नाही त्यामुळे बुधवारी पुन्हा कारखान्यावर जाऊन पदाधिकाऱ्यांनी बिले कधी जमा करणार असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी व्यवस्थापकीय संचालक पाटील यांनी कोरोनामुळे बिल देण्यास विलंब झाला होता मात्र दोन दिवसापूर्वी 80 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून दोन दिवसात इतर शेतकऱ्यांनाही बिले दिली जाणार आहेत अशी माहिती दिली.

यावेळी युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, सचिव सदाशिव पाटील, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, परशराम गोरे, राहुल पाटील, सहदेव हेब्बाळकर आदी यावेळी उपस्थित होते.
…..
प्रतिक्रिया
शेतकऱ्यांची बिल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने जाऊन बिले देण्याची मागणी केली होती सुरुवातीला लॉकडाऊन आणि इतर कारणे देत बिले घेण्यास विलंब झाला याची माहिती देण्यात आली होती मात्र गुरुवारी कारखान्याने बिले जमा करण्यास सुरुवात झाली अशी माहिती दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे उर्वरित शेतकऱ्यांची लवकर बिले द्यावी.
धनंजय पाटील, अध्यक्ष युवा समिती, खानापूर तालुका

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *