खानापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. शाळा, काॅलेज बंद आहेत. अशातच मुलाना घरात डांबुन ठेवावे लागत आहे.
असे असताना खानापूर शहरातील दुर्गानगरातुन दोन शाळकरी मुले बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी दि. २८ रोजी घडली आहे.
यामध्ये श्रेयस महेश बाबसेट (वय १३) व रोहित अरूण पाटील (वय १५) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. सोमवारी दुपारी २.३० घरातुन बाहेर पडली असुन अद्याप परतलेली नाहीत. सोमवारी दुपारी रेल्वे ट्रॅककडे जाताना पाहिले असल्याचे काहीनी सांगीतले आहे. तरी वरील फोटोतील मुले कुणास आढळल्यास खानापूर पोलिस स्थानकाशी संपर्क करावा, असे आवाहन मुलांच्या पालकांनी केले आहे.
Check Also
खानापूरात उद्या विसावे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन; भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी
Spread the love खानापूर : शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशन खानापूर व गुंफण साहित्य अकादमीतर्फे खानापूर येथील …