लोकमान्य टिळक गणेश महामंडळ बेळगाव
बेळगाव : बाप्पाच्या आगमनाला अवघा दीड महिना शिल्लक पण गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची भूमिका अजूनही अस्पष्टच. साधेपणाने उत्सव साजरा करणे म्हणजे नेमकी कसा साजरा करायचा, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही.
गणेश मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांना परवानगी, गणेश मूर्तीची मर्यादा किती असणार, मूर्तींचे विसर्जन नियोजन कसे असणार, मंडळासाठीची नियमावली याबद्दल कोणतीच ठोस माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे गणेशोत्सव मंडळ, मूर्तिकार व भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याकरिता लोकमान्य टिळक गणेश महामंडळाच्या वतीने मंगळवारी सकाळीं जिल्हाधिकारी हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले आहे.
बेळगावातील अनेक मंडळांनी कोरोना संकट लक्षात घेऊन गणेश मूर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला. पण शहरात अजूनही काही मंडळ राज्य सरकारच्या उंची बाबतच्या निर्देशाच्या प्रतिक्षेत आहे. गणेश मूर्तीचे आगमन व विसर्जन साधेपणाने म्हणजे नेमके कसे होणार, तलावाजवळ सोय कशी करणार, तिथे सामाजिक अंतर राखणे याबद्दल अजून कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही.
सर्व निर्णयाच्या प्रतिक्षेत सामान्य नागरिक आणि मंडळ आहेत. याबाबत सरकारने लवकरात लवकर नियमावली जाहीर करावी अशी मागणी लोकमान्य टिळक महामंडळाच्या व मूर्तिकार, मंडळ व नागरिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे
यावेळी लोकमान्य महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, हेमंत हावळ, गिरीश धोंगडी, सुनील जाधव अर्जुन राजपूत, प्रवीण पाटील, नितीन जाधव, रवी कलघटगी यासह अन्य उपस्थिती होते.