Thursday , June 4 2026
Breaking News

जेडीएसची खानापूरात इंधनच्या वाढत्या दरासंदर्भात निदर्शने, निवेदन

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच देशभर पेट्रोल, डिझेल, गॅस आदीच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने सामान्यांचे जगणे मुष्किल झाले आहे.
पेट्रोलच्या दराने १०० री गाठली, तर घरगुती स्वयंपाक गॅस ९०० रुपयापर्यंत गेल्याने महिलांना गॅसवर स्वयंपाक करणे डोळ्यातुन पाणी येत आहे.
केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असुन इंदन दर वाढीचा भडका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याला सरकार जबाबदार असुन सत्ताधारी पक्षाने सत्तेवरून उतरण्याची वेळ आली. या सरकारला जनता कदापी माफ करणार नाही. तेव्हा भाजप सरकारने दर कमी करावा. अन्यथा सत्ता सोडावी. असे मत जेडीेएसचे नेते व मलप्रभा साखर कारखान्याचे अध्यक्ष नासीर बागवान यांनी तहसीलदारांना निवेदन देताना व्यक्त केले. यावेळी महिला अध्यक्षा व नगरसेवक मेघा कुंदरगी, जिल्हा अध्यक्ष शंकर मुडलगी आदिंनी विचार व्यक्त केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन करत मंगळवारी दि. २९ रोजी उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांना निवेदन सादर केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.
प्रारंभी जेडीएसचे ज्येष्ठ नेते व मलप्रभा साखर कारखान्याचे अध्यक्ष नासीर बागवान यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल पंपापासुन तहसील कार्यालयपर्यंत रॅली काढण्यात आली.
यावेळी रेव्हना सिध्दया हिरेमठ, रवी काडगी, डी. आर. पाटील, एम. ए. इनामदार, एल. टी. बिच्चणावर, राजू खातेदार, बसवाणा तिरमुरी, दीपा पाटील, नागराज हुबळी, खाजा याजवाड, लबीब शेख, हबीब हुंदूर, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोहत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध हिंदू संघटना, धार्मिक संस्था, सामाजिक संघटना तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *