खानापूर : गायरान जमिनीमध्ये कचरा प्रकल्प उभारण्यास खानापूर तालुक्यातील विविध गावांमधून तीव्र विरोध होऊ लागला असून हलशी ग्रामपंचायत क्षेत्रातील नरसेवाडी येथे कचरा प्रकल्प उभारण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे तसेच याबाबतचे निवेदन हलसी ग्रामसभेला देण्यात आले असून प्रकल्प रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
हलसी ग्रामपंचायत क्षेत्रातील नरसेवाडी गावाजवळ सर्वे क्रमांक 94 मध्ये गायरान जमीन असून या ठिकाणी नागरिक आपली जनावरे चरावयास सोडत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून गायरान क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यासह इतर कामांसाठी गायरानचा वापर करण्याकडे लक्ष दिले जात आहेत त्याबाबत नरसेवाडी ग्रामस्थांनी सातत्याने विरोध दर्शवला आहे. तरीही नरसेवाडी ग्रामस्थांना विश्वासात न घेता कचरा प्रकल्प उभारण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले आहे कोणताही प्रकल्प गावाजवळ होत असताना ग्रामस्थांची परवानगी घेणे आवश्यक असते मात्र याकडे हलसी ग्रामपंचायत व ग्राम विकास अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली असून कचरा प्रकल्पामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी निवेदन देऊन हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी केली आहे. तसेच हा प्रकल्प बंद न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी परशराम पाटील, कृष्णाजी पाटील, शंकर पाटील, मारुती पाटील, प्रज्योत पाटील, सहदेव पाटील, नागराज पाटील, प्रशांत पाटील, महादेव पाटील, विष्णू पाटील, विक्रांत पाटील, शांताराम पाटील आदी उपस्थित होते.
…..
खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये कचरा प्रकल्प उभारण्यासाठी गायरान जागांची निवड करण्यात आल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे गायरान जमिनीचा वापर कचरा प्रकल्पांसाठी करू नये तसेच प्रकल्प उभारताना ग्रामस्थांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होणे अशा ठिकाणी प्रकल्प उभारावा या मागणीसाठी खानापुर तालुका महाराष्ट्र एकीकर युवा समितीच्यावतीने वतीने लवकरच तहसीलदार व जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले जाणार आहे. तसेच विविध ग्रामपंचायतीना भेट देऊन ज्या गावांचा कचरा प्रकल्प उभारण्यास विरोध आहे. त्या ठिकाणी प्रकल्प उभारू नये अशी मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Check Also
म. मं. ताराराणी पदवीपूर्व कॉलेजची कुमारी साधना होसुरकर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात…
Spread the love खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर या विद्यालयातील …