तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड पोलीसांनी
दि. 29 जून रोजी हिंडगाव येथे कारवाई करून ३१३२२४ रुपयांच्या चोरट्या गोवा बनावटीच्या दारूसह दोन आरोपींना अटक केली.
दि.29 रोजी रात्री बारा वाजता चंदगड पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार पो.कॉ.ब.नं 2279 गवळी यांना त्यांचे गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली होती. सावंतवाडी ता. सिंधुदुर्ग गावातील सुरेश बाबाजी गावडे रा. सावंतवाडी (सिंधुदुर्ग) मार्गे हिंडगाव ता. चंदगड गावातून गवसे गावी गोवा बनावटीच्या दारूची चोरून वाहतूक करणार आहे. अशी माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलीसांनी पोहवा.2162 नांगरे, पो कॉ 2279 गवळी व पोकॉ 1070 गुरव यांना सदर ठिकाणी जाऊन कारवाई करणेबाबत आदेश केले होते. त्याप्रमाणे वरील स्टाफ रवाना होऊन सदर ठिकाणी पाहणी करत असताना एक वाजण्याच्या सुमारास हिंडगाव ता.चंदगड गावामध्ये चारचाकी मारुती ओमीनी गाडी नं. MH-07-AB-2027 ही सदर ठिकाणी दिसली. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये खालील वर्णनाचे गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स मिळून आले. त्यामध्ये एकूण 129,024 /-रुपयाची दारू व 1,50,000 /- मारुती ओमीनी
असा एकूण 3,13,224/- रुपये किंमतीचा प्रोव्ही गुन्ह्याचा मुद्देमाल महाराष्ट्र राज्याचा कर चुकून त्याची विक्री करणेकरिता वाहतूक करत असताना सुरेश बाबाजी गावडे रा.सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग 2) दशरथ अर्जुन सावंत रा.गवसे ता.चंदगड यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करणेत आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो.ना 701 महापूर हे करत आहेत. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक सतिश होडगर यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा 2162 रोहिदास नांगरे, पोकॉ 2279 वैभव गवळी, पोकॉ 1070 दिगंबर गुरव यांनी केला.
Check Also
तिलारी- दोडामार्ग घाटात गोमांस वाहतूक करणारा ट्रक पकडला, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त
Spread the love चंदगड : तिलारी- दोडामार्ग घाटात कोदाळी गावच्या हद्दीत तब्बल १५ लाख रुपये …