Saturday , July 27 2024
Breaking News

भाजपच्या त्रिकूटाने विश्वासघात केला; रमेश जारकीहोळींचा गंभीर आरोप

Spread the love

अचानक दिल्लीला रवाना

बंगळूर : भाजपच्या त्रिकूटाने माझा विश्वासघात केला. वेळ आल्यानंतर त्यांची नावे जाहीर करू, ते माझा तिरस्कार करतात, योग्य वेळी त्यांना धडा शिकवू, असा इशारा माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी स्वपक्षीय नेत्यांनाच दिला.
आमदार रमेश जारकीहोळी अचानक काल रात्री दिल्लीला रवाना झाले. रात्री दोन वाजता अचानक फोन आल्याने दिल्लीला यावे लागले, असे त्यांनी सांगितले. त्यांनी आरएसएसच्या एका नेत्याच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन चर्चा केल्याचे समजते.
रमेश जारकीहोळी यांनी दिल्लीला पोहोचल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. एका आरएसएस नेत्याच्या घरी सुमारे 45 मिनिटे बैठक झाली. बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे समजू शकले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठे औसुक्य निर्माण झाले आहे.
दिल्लीत जारकीहोळी आणखी काही भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याचे समजते.
याआधी दिल्लीत विमानतळावर पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले, भाजपमधील तिघा जणांनी माझा विश्वसघात केला आहे. त्या तिघांची नावे मी आत्ताच सांगणार नाही. वेळ आल्यानंतर ती जाहीर करण्यात येतील. ते माझा द्वेष करीत आहेत. माझी बदनामी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांचे षडयंत्र उघड होण्याचा काळ आता जवळ आला आहे, असे बोलून त्यांनी स्वपक्षीयांविषयीच असमाधान व्यक्त केले.
आपला द्वेष करणाऱ्यांविरुद्ध भाजप हायकमांडकडे ते तक्रार करण्याची शक्यता आहे. दुसऱ्या पक्षातून येऊन जारकीहोळी भाजपात वरचढ होण्याची त्यांना भीती आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याविरुध्द कटकारस्थान रचले असल्याची त्यांची तक्रार आहे. त्यांच्याविरुद्ध हायकमांडकडे तक्रार करून त्यांच्यावर कारवाई करण्याची जारकीहोळी मागणी करणार असल्याचे वृत्त आहे.
मागील आठवड्यात रमेश जारकीहोळी मुंबईला गेले होते. तेथे भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. आपल्यामुळे राज्यात पक्ष सत्तेवर आला आहे पण आपणालाच मंत्रिमंडळातून वगळण्याचे षडयंत्र आखण्यात आले, अशी त्यांनी फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती अशी माहिती उपलब्ध झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच ते दिल्लीला गेले असून स्वतः फडणवीसही तेथे उपस्थित आहेत. फडणवीस भाजप नेत्यांकडे जारकीहोळीची बाजू मांडणार असल्याचे समजते.
जारकीहोळी यांच्या राजकीय हालचालीमुळे राजकीय वर्तुळात मोठे

About Belgaum Varta

Check Also

माजी सैनिक संघटना संघटनेतर्फे कारगिल विजयोत्सव

Spread the love  बेळगाव : माजी सैनिक संघटना संघटनेने आज कुमार गंधर्व सभागृहात कारगिल विजय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *