Sunday , July 13 2025
Breaking News

धक्कादायक! त्या दोघा मुलांचा नदीत बुडून मृत्यू

Spread the love

बेळगाव : बेपत्ता झालेली दुर्गानगर खानापूर येथील दोन मुलं खानापूरनजीक मलप्रभा नदीत बुडून मरण पावली आहेत. दुर्गानगर येथील दोन मुले श्रेयश महेश बाबसेट (वय 13) व रोहित अरूण पाटील (वय 15) सोमवारी बेपत्ता झाली होती. ते दोघेही 2.30 पासुन घरातुन बाहेर पडले होते. श्रेयस या मुलाचा मृतदेह रेल्वे ट्रँक लाल ब्रीजवरच्या बाजूला नदी पात्रात सापडला असुन रोहित या मुलाचा मृतदेह अग्नी शामक दल व पोलीस कर्मचारी शोधत आहेत.
आज दुपारपासुन त्या ठिकाणी मृतदेह शोधकार्य अग्नी शामक दल व पोलीस दल करत आहे. 5 ते 6 मुले घरी न सांगता नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेली होती. पण पोहता येत नसल्याने वरील दोन मुले बुडाली. ते बघुन बाकीची मुले घाबरली व हे प्रकरण आपल्या अंगलट येईल असे वाटल्याने व पालक ओरडतील या भीतीने बुडालेल्या मुलांचे कपडे व चप्पल खड्डा काढून त्यात लपवले व गुपचुप आपापल्या घरी गेली. कोणालाही या गोष्टीची कल्पना दिली नाही.
शेवटी घाबरल्याने व अधिक चौकशीनंतर आज सकाळी त्या मुलांनी सदर घडलेली घटना व जागा याची माहिती दिली. त्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आल्याचे समजते. यातील एका मुलाचा नदीत मृतदेह सापडला आहे. मदतकार्यात माजी आमदार अरविंद पाटील व कॉंग्रेसचे युवा नेते इरफान तालीकोटी सहकार्य करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कन्नड सक्तीच्या फतव्याविरोधात युवा समिती सीमाभागची बैठक

Spread the love  सीमाभागातल्या मराठी बहुभाषिक मतदारसंघातून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार बेळगाव : म. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *