खानापूर (प्रतिनिधी) : सरकारच्या कचरा डेपोबाबत खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीतून नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यात प्रत्येक ग्राम पंचायत कोणते ना कोणते कारण पुढे करून कचरा डेपो नको असा सुर काढत तालुक्यातील तहसील कार्यालयाला, तालुका पंचायतीला तसेच जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा सपाटा
चालू केला आहे. मात्र तालुका अधिकारी याकडे गांभीर्याने लक्षच देत नाहीत.
यासाठी तालुक्यातील जनतेला गावातील कचरा बाहेर गेला तर गाव स्वच्छ राहिल, कोणताच आजार खेडोपाडी होणार नाही.
कचरा डेपोसाठी गावची सर्वच गायरान जमिनी अथवा गावठान जमिन बळकाविली जाणार नाही. याची कल्पना देऊन कचरा डेपोचे महत्व यापासून कोणता फायदा होणार आहे. कचरा डेपोपासून कोणताच त्रास होणार याबाबत कधीच माहिती दिली नाही. त्यामुळे नागरिकांतून गैर समज होऊन कचरा डेपो म्हणजे गोळा केलेला कचरा एका ठिकाणी ढिग मारून ठेवणे. त्यापासून दुर्गंधी निर्माण होऊन रोगराई पसरणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याकडे संबंधित तालुका अधिकाऱ्यांनी म्हणावे तितकेसे गांभिर्य घेतले नाही. त्यामुळे प्रत्येक ग्राम पंचायतीकडून कचरा डेपोबाबत विरोध होताना दिसत आहे.
याबाबत कचरा डेपोबद्दल होणारे फायदे, गावकऱ्यांच्यापर्यंत पोहचणारे नाहीत तोपर्यत कचरा डेपोला विरोध होणे साहजिकच आहे.
तेव्हा सरकारच्या योजनेची माहिती कळणे काळाची गरज आहे
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …