Sunday , July 26 2026
Breaking News

खानापूर तालुक्यातील रस्ते झाले खड्डेमय, शासनाचे दुर्लक्ष

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील खडोपाडीचे रस्ते झाले खड्डेमय मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याचे कारण म्हणजे
खानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका. त्यामुळे पावसाळा आला की खानापूर तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा होतच असते. याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे.
तालुक्यातील कापोली शिवठाण कोडगई रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. त्यामुळे या रस्तावरची वर्दळ खूपच ठप्प झाली आहे. यासंदर्भात नुकताच खानापूर तालुका युवा समितीच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.
तसेच बेकवाड हलशी या रस्त्याची अवस्था खूपच कठीण आहे. या रस्तावरून ८० टन अवजड वाहनांची ये-जा सुरू आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अवजड वाहनामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. याचा त्रास याभागातील नागरिकांना होत आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील बैलूर, देवाचीहट्टी, तोराळी याही रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे.
मुख्य म्हणजे खानापूर-लोंढा- रामनगर या महामार्गात तर जागोजागी खड्डे पडले आहे. त्यामुळे वर्षभर हा महामार्ग प्रवाशांना शाप ठरला आहे. अशा अनेक रस्त्याची तालुक्यात दैना झाली आहे. मात्र याकडे तालुका प्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष होत आहे.
याबाबत रास्ता रोको, मोर्चे निवेदन देऊन त्याला कचऱ्याची टोपली दाखविण्यात आली आहे.
तेव्हा खानापूर रस्त्याबाबत योग्य तो निर्णय केव्हा होणार याकडे तालुक्यातील जनता चातक पक्षाप्रमाणे वाट पहात आहे.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *