बेळगाव : कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात येण्याची शक्यता जगभर वर्तविली जात आहे आणि याच अनुषंगाने फ्लू व्हॅक्सिनचे लसीकरण करण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिव्हाळा फाउंडेशनतर्फे 22 जून रोजी नर्तकी प्राईड अपार्टमेंटमध्ये 1 ते 18 वयोगटातील मुलांचे फ्लू व्हॅक्सिन् लसीकरण बाल रोग तज्ञ डॉक्टर राजश्री अनगोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर सविता कद्दू, अध्यक्षा माधुरी जाधव, सचिव आरती निपाणीकर, सदस्य योगिता पाटील, ज्योती मिरजकर, स्मिता शिंदे विनय पाटील, शाबाज जमादार, गजानन वृषभ, श्रीनिवास, शुभम हे उपस्थित होते.
