बेळगाव : बेळगावमधील ऑटोनगर येथे धावत्या कारने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवून उतरल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली.
रविवारी रमेश बिरादार हे आपली कार घेऊन ऑटोनगरातून चालले होते. आरटीओ ग्राउंडजवळ त्यांना आपल्या कारमधून धूर येताना दिसला. त्यामुळे ते आपली कार थांबवून खाली उतरले. अगदी पाचच मिनिटात संपूर्ण कारने पेट घेतला. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन आग विझवली मात्र तोपर्यंत संपुर्ण कार आगीच्या भक्षस्थानी पडली होती. माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.