बंगळूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांनी रविवारी (ता.११) कर्नाटकचे १९ वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मावळते राज्यपाल वजूभाई रुदाभाई वाला यांची ते आता जागा घेतील.
कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती अभय श्रीनिवास ओका यांनी गेहलोत यांना राजभवन येथे पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मावळते राज्यपाल वजुभाई वाला, मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी, खासदार, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
७३ वर्षीय गहलोत हे केंद्रात सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री होते. कर्नाटकात नवीन पद स्वीकारण्यापूर्वी राज्यसभेचे ते नेते होते. एक मजूर म्हणून काम करणारे गेहलोत आता राज्याच्या राज्यपाल पदापर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्यांचा कार्यकाळ अधिक सक्रिय होईल, अशी अपेक्षा कर्नाटकातील राजकीय पक्षांना आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पक्षातील मूळ राजकारणी असलेल्या गेहलोत यांच्याकडून राज्यातील भाजपला मोठी अपेक्षा आहे. दुसरीकडे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांत राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारल्यामुळे सत्ताधारी प्रशासनावर शक्यतो प्राधान्यपूर्ण वागणूक मिळण्याची कॉंग्रेसला शंका आहे.
गेहलोत यांच्या प्रवेशामुळे राज भवन अधिक सक्रिय होईल, अशी दोन्ही पक्षांना आशा आहे. “गहलोत हे निर्दोष सचोटीची व्यक्ती आहे. त्यांच्या पाठिशी मोठा अनुभव आहे. त्यांच्याकडे राजभवनात मुद्दे मांडण्याची क्षमता आहे. गेल्या काही वर्षात – दहा वर्षांपासून राजभवन क्षीण होत आहे. मला विश्वास आहे की गहलोत हे प्रश्न सोडवू शकतील, असे भाजपचे विधान परिषद सदस्य लेहरसिंग सिरोया म्हणाले.
खरं तर, गहलोत कर्नाटकात नवीन नाहीत. २००६ मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस असताना त्यांना कर्नाटकात पक्षाचे प्रभारी म्हणून नेमण्यात आले होते. त्याच वर्षी धजदशी युती करून कर्नाटकात पहिल्यांदाच भाजपाची सत्ता आली होती.
कर्नाटकमधील भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असताना भारद्वाज यांची राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय असलेले गेहलोत यांच्या नियुक्तीमुळे भाजपला कर्नाटकमध्ये आपले स्थान व्यवस्थित करण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
एआयसीसीचे सचिव व कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव म्हणाले, ‘गेहलोत पक्षप्रती निष्ठा बाजूला ठेवू शकतील आणि आपल्या पदाच्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडतील, अशी मला आशा आहे.’
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …