बेळगाव : ब्रम्हलिंग युवक मंडळ बेन्नाळी यांच्यावतीने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमासाठी आर्थिक मदत करण्यात आली. ब्रम्हलिंग युवक मंडळ बेन्नाळी यांच्या माध्यमातून बेन्नाळी येथे युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके तसेच युवा समिती पदाधिकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत सिंह-समिती-शेळके या झंझावातामुळे मराठी भाषिकांमध्ये पुन्हा एकदा लढण्याचे बळ आले आहे आणि मराठी भाषिकांनी आता ही वज्रमुठ अबाधीत ठेवून सीमालढ्याला बळकटी देणे गरजचे आहे, युवा समितीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविले जातात आणि याच माध्यमातून समिती पुन्हा एकदा घराघरात पोहचवणे हे आमचे कर्तव्य आहे, असे शुभम शेळके यांनी सांगितले.
यावेळी युवा समितीच्या कार्याची दखल घेत पुढील सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमासाठी मंडळाच्या वतीने युवा समितीला ११००० हजारांची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी मंडळाच्या वतीने नागेश जाधव, मदन पाटील, मोहन लाटूकर, प्रसाद देसुरकर, सुनील खांडेकर, युवा समिती कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, विनायक कावळे, संतोष कृष्णाचे, राजू कदम, प्रवीण रेडकर, आकाश भेकणे आणि गावातील युवक उपस्थित होते.