आजर्यातील स्थिती : नागरिक संभ्रमात
आजरा (ज्ञानेश्वर पाटील) : कोरोनाच्या महामारीमध्ये कोविड सेंटर ही उपचाराची केंद्र बनली आहेत. शासनाने सुरवातीला कोविंड सेंटर सुरु करण्याबरोबर खाजगी कोविड सेंटरला ही काही अटीवर मान्यता दिली आहे. सरकारी कोविड सेंटरवर येणारा ताण, वाढती रुग्ण संख्या, शासकीयमधील अपूरे कर्मचारी यामुळे काहि ठिकाणी खाजगी कोविड सेंटर मान्यता दिली आहे. पण चक्क आजर्यातील शासकीय कोविड सेंटरवर झळकत असलेला एका खाजगी कोविड सेंटर फलक पाहून नागरिक संभ्रमाअवस्थेत पडले आहेत. हे शासकिय कोविड सेंटर की खाजगी अशी प्रतिक्रिया आजरेकरवासीयाकडून व्यक्त होत आहे.
या आजरा शासकिय कोविड सेंटरवर हा खाजगी कोविड सेंटरचा बोर्ड कुणी लावला व त्यांच्यावर कारवाई का होत नाही? याचे गौडबंगाल नेमके काय अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.