बेळगाव : चंदनहोसूर (ता. बेळगाव) येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आमदार निधीतून 6.40 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यात 3 लाख रुपये देवस्थान समितीकडे सुपूर्द केले.
यावेळी त्या म्हणाल्या, मतदारसंघातील जीर्ण मंदिरांचा विकास घडवून आणण्याचे प्रयत्न आपण चालविले आहेत. चंदनहोसूर परिसरातील रस्त्यांची सुधारणा घडवून आणली असून यापुढेही या भागाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. यावेळी महेश हिरेमठ स्वामी, रायप्पा तवगद, सदेप्पा तानसी, नागलिंग बडिगेर, शिवनेप्पा पाटील, अडिवेप्पा पाटील, कल्लाप्पा कुंदरगी, नागनगौडा पाटील आदींसह ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान समितीचे सदस्य उपस्थित होते.
Check Also
बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे संस्थेचा 25 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
Spread the love पुणे : बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे या संस्थेचा 25 वा …