बेळगाव: कोरोना काळात अनेकांना आरोग्यसेवेसाठी मोठी धडपड करावी लागली. अनेकांना रुग्णालयात पोचण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका ही उपलब्ध झाल्या नाहीत. याची दखल घेऊन ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव यांनी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार बेळगाव शहराच्या जनतेच्या आरोग्य सेवेसाठी गणेश सेवा संघ मंडळाकडे रुग्णवाहिका सोपविण्यात आली.
आपात्कालीन सेवेसाठी आपणास रुग्णवाहिका सेवेचे आवश्यकता असल्यास रमेश पाटील यांचा मोबाइल नंबर 9448578501 व संतोष पेडणेकर यांचा मोबाइल नंबर 9986225003 वर कॉल करण्याचे आवाहन केले आहे. व रुग्णवाहिका देतेवेळी श्री. गजेश अनंत गडकर, श्री. शिवकुमार मालकनवर, श्री. राजन जाधव, श्री. अक्षय साळवी, श्री. चेतन आनंदगडकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.