बेळगाव : पी बी रोडवरील रूपाली कन्व्हेशन सेंटरच्या सभागृहात रोटरी क्लब बेळगाव दक्षिण पुरस्कृत रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगाव दक्षिणचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. अध्यक्षपदी राष्ट्रीय स्केटींगपटू निखिल रमेश चिंडक तर सचिवपदी याची खोडा यांची निवड करण्यात आली आहे.
पदग्रहण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, इंस्टॉलींग ऑफिसर व्यंकटेश देशपांडे, रोटरी क्लब ऑफ बेळगाव दक्षिणचे अध्यक्ष अशोक नाईक, विरेन कलघटगी, विशाखा पेडणेकर, साहिल गांधी, माजी अध्यक्ष सिद्धांत सिदनाळे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी मोनिका असोंदे हिने उपस्थित पाहुण्यांचा परिचय व स्वागत केले, त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रिती निलगिरी हिने मागील वर्षी क्लबच्यावतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर अविनाश पोतदार यांच्या हस्ते किरण तळेकर यांना बेस्ट रोट्रॅक्ट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इंस्टॉलींग ऑफिसर व्यंकटेश देशपांडे यांनी निखिल चिंडक यांना नूतन पदग्रहणाची सूत्रे सोपविली यानंतर उपस्थित पाहुण्यांनी आगामी वर्षात नूतन कार्यकारिणीला कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
2021-2022 सालाकरिता निवडण्यात आलेल्या रोट्रॅक्ट क्लब बेळगाव दक्षिणची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: अध्यक्ष निखिल चिंडक, उपाध्यक्ष मोनिकाअसुंदी, खजिनदार लिमेश नागडा, सचिव याची खोडा, सहसचिव अक्षित जैन, क्लब संचालक अनुष्का बनवांना, सह उर्विका पाटील, तन्मय कुचानुरे, पीटर एस, नमन बक्षी, दिवित बागी, वंशिका मलवाडकर, पृथ्वी निराळगीमठ, सेजल राजपुरोहित, कार्तिक देशपांडे, अमन चोपडा, सुशांत इंगळे, फिलिप्स सायमन, रजत जैन, निखील जैन, अनिश नाईक, रोहित कुलकर्णी, यांनाही विविध पदावर नेमणूक करण्यात आली.
