बेळगाव : उचगाव येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलमधील उचगाव केंद्रातील दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल, बिस्कीट, आणि मास्कचे वितरण स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये नुकतेच पार पडले. मणुर येथील प्रसिद्ध आर्किटेक्ट इंजिनियर आणि दानशूर व्यक्तीमत्व आर. एम. चौगुले यांनी सर्व साहित्य दिले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उचगाव ग्रामपंचायतीचे अध्यक्ष जावेद जमादार होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आंबेवाडी ग्रामपंचायतचे अध्यक्ष चेतन पाटील, उचगाव ग्रामपंचायतच्या माजी अध्यक्षा योगिता देसाई, एल. डी. चौगुले, बाळकृष्ण तेरसे, यादो कांबळे, गजानन नाईक, रूपा गोंधळी, रूपाली गिरी, अशोक चौगुले, नागरत्न कोरडे, अनुसया कोलकार, तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे वाय. बी. चौगुले, गणपत देसाई, वैजू कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
