खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील लोंढा येथील वनखात्याच्यावतीने रोप लागवड कार्यक्रम नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरएफओ प्रशांत गौरानी होते. तर प्रमुख पाहूणे लोंढा जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य बाबूराव देसाई, ग्राम पंचायत पीडीओ बलराज बजंत्री, ग्राम पंचायत अध्यक्षा शिवरीन डायस, उपाध्यक्ष संदीप सोज आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक लक्कापा रावळ यांनी केले.
उपस्थित पाहुण्यांच्याहस्ते रोप लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन लोंढा परिसरात ८०० झाडे लावून वाढविल्याबद्दल पी. एस. जळगेकर, व्ही. एस. मिराशी, जानू ब्राह्मनकर, बुजापा मिराशी, महादेव शिरोडकर, महादेव पाटील, तसेच लिपिक सुरेश पाटील, आदीचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बाबूराव देसाई, बलराज बजंत्री आदीची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मडवाळपा मजगौंडा यांनी केले. तर आभार गिरीश बनद यांनी मानले.
Check Also
खानापूर-लोंढा महामार्गावर अपघात : एक ठार, एक गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : खानापूर-लोंढा महामार्गावर जोमतळे गावानजीक, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वेगाने रस्त्या …