बेळगाव : ग्रामीण भागातील निसर्ग सौंदर्य सृष्टीने नटलेला भाग. परंतु ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी, कुपोषणसह आधी गंभीर समस्या आणि स्थलांतर या गंभीर समस्या बनत चालल्या होत्या. परंतु प्रशासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महिलानमध्ये कमालीचे बदल घडवले आहे.
ग्रामीण भागातील महिला रोजगार कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव, पिंटू पाटील, जोतिबा दौलतकर, राजू तंगणकर, यांनी ग्रामीण भागातील मराठा व अल्पसंख्याक रोजगार महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ग्रामीण भागातील रविवारी काही ठिकाणी भेटी दिल्या.
सुनील जाधव म्हणाले, रोजगार महिला कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही. रोजगार हमीची कामे ग्रामपंचायतीतर्फे देण्यात येत असली तरी सरकारने कोणत्याही योजनेची मार्गसुची सोपी केली पाहिजेत, जेणेकरून कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी गोरगरिबांना कागदपत्रे जमा करण्यासाठी वेळ वाया जाणार नाही. कोणत्याही योजनेची प्रतिक्रिया सहजपणे उपलब्ध करून द्यावी. तसेच तुमच्या कोणत्याही कागदपत्रांची अडचण असल्यास ती कागदपत्रे व्यवस्थित करून देण्यात येईल. तुम्ही फक्त आमच्या विभागप्रमुखाना संपर्क साधा.
पिंटू पाटील यांनी, महिलाना आम्ही बचत गटांना सामावून वृक्ष लागवडीचे राष्ट्रीय काम म्हणून स्थलांतरित मजुरांना खड्डे मारण्याचे काम दिले म्हणूनच मोहीम यशस्वी होऊ शकली. ग्रामीण भागातील महिला बचत गटात अनेक महिला शेतमजूर महिला आहेत. त्या अनुभवी असल्याने त्यांना रोपे तयार करण्याचे काम देणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने महिला बचत गटांना या मोहिमेत अधिकृतरित्या सामावून घ्यायला हवे.
यावेळी रोजगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.