खानापूर (प्रतिनिधी) : पावसाचा जोर वाढत आहे. सतत मुसळधार पाऊस. गेल्या चार दिवसापासुन खानापूर शहरासह तालुक्यात पडत आहे. मुसळधार पावसामुळे शहरासह तालुक्यात जुन्या घरांच्या भिंती कोसळुन लाखाचे नुकसान होत आहे.
खानापूर शहरातील भट्ट गल्लीतील रणजित जाधव व श्री. कितूर यांच्या घराच्या भिंती नुकताच मुसळधार पावसाने कोसळुन लाखोचे नुकसान झाले.
यावेळी संबंधित खात्याकडून नुकसानग्रस्थाना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
तेव्हा तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी पाहणी करून योग्य ती कारवाई करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
