खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील इदलहोंड दहावीच्या परीक्षा केंद्रावर तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी भेट देऊन पाहणी केली.
तालुक्यात पहिल्या दिवशी ४२१४ विद्यार्थी पैकी केवळ सहा विद्यार्थी गैर हजर होते. तालुक्यात दहावी परीक्षेसाठी २३ परीक्षा केंद्राची स्थापना करण्यात आली होती. तर ३७१ परीक्षा खोल्याचे आयोजन करण्यात आले.
या दहावीच्या परीक्षेत १९०० मुले, १७८५ मुली, असुन बहिस्थ विद्यार्थ्यामधुन ३६५ मुले व ७४ मुली अशी एकूण ४२१४ विद्यार्थी परीक्षेला बसणार होते त्या पैकी सहा विद्यार्थी गैरहजर होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटाइजर, सोशल डिस्टन सक्तीचे आहे. यावेळी तहसीलदार, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी, बीईओ असे तीन फरारी पथके असुन पोलीस, आरोग्य खात्याचे कर्मचारी वर्गाची नेमणुक करण्यात आली आहे. परिक्षेच्या आवारात विद्यार्थी, परिक्षक व्यतिरीक्त कुणालाही परवानगी देण्यात आली नाही.
