खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) ग्राम पंचायतीला ग्राम विकास आणि पंचायतराज्य खात्याचे सचिव एल. के. अतिक यांनी नुकताच भेट दिली. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच व्ही., तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी प्काश हलमकन्नावर, तालुका पंचायतीचे उपसंचासक देवराज, पीडीओ अनंत भिंगे आदी उपस्थित होते.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्षा विद्या जितेंद्र मादार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी येथील जाॅइंट सेंट्रल स्कूलची पाहणी केली. व येथील परिसराची पागणी करून समस्या जाणून घेतल्या.
जाॅइंट सेंट्रल स्कूल ही शाळा १८० वर्षापूर्वीची तालुक्यात सर्वात जुनी शाळा आहे. या शाळेत मराठी कन्नड, उर्दू अशा तिन्ही भाषा एकाच ठिकाणी शिकवल्या जातात.
यासाठी ही जुनी इमारत पाडवून नविन सुसज्ज तसेच सर्व सोयीनियुक्त अशी इमारत बांधण्याचा आराखडा तयार करण्याची सुचाना केली.
गावाला लिक्वीड वॉटर, मॅनेजमेंट सिस्टीम हा जिल्ह्यातील पहिला पाणी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी नंदगड ग्राम पंचायतीच्यावतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्षा विद्या मादार, जिल्हा पंचायत सदस्य जितेंद्र मादार, पीडीओ अनंत भिंगे कर्मचारी उपस्थित होते.
Check Also
खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना यांच्यावतीने रविवारी आरोग्य तपासणी शिबीर
Spread the love खानापूर : खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना खानापूर यांच्या सौजन्याने …