बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण समारंभ उद्या शुक्रवार दि. 23 जुलै रोजी सायंकाळी 7:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
शहरातील शगुन गार्डन येथे हा समारंभ होणार असून याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे नूतन अध्यक्ष म्हणून शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी मिलिंद पाटणकर हे अधिकार ग्रहण करणार आहेत. त्याचप्रमाणे सेक्रेटरी म्हणून उद्योजक लक्ष्मीकांत नेतलकर आणि खजिनदार म्हणून माणिकबाग ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक शील मिरजी पदभार स्वीकारतील.
रोटरी क्लब ऑफ बेळगावची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्ष -मिलिंद पाटणकर, उपाध्यक्ष -जयदीप सिद्दण्णावर, सेक्रेटरी -लक्ष्मीकांत नेतलकर, जॉईंट सेक्रेटरी -अक्षय कुलकर्णी, खजिनदार -शील मिरजी, रोटरी फाउंडेशन – माजी अध्यक्ष ॲड. सचिन बिच्चू, कार्यकारिणीचे सदस्य -सचिन खटाव, अल्पेश जैन, डॉ. सतीश धामणकर, अमित साठे, विक्रांत कुडाळे, मनोज मायकल, शैलेश मांगले आणि संतोष पाटील, मावळते अध्यक्ष डॉ. के. एम. केळुसकर.