Monday , September 21 2026
Breaking News

कंटेनर – दुचाकीचा भीषण अपघात : विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : खानापूर तालुक्यातील जांबोटीजवळील आमटे गावाजवळ कंटेनर व दुचाकीच्या अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव निखिल बाबागौडा पाटील (१९) असे असून तो चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावातील रहिवासी आहे. बेळगाव येथील जीआयटी महाविद्यालयात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले. आणखी एक विद्यार्थी मुडलगी येथील निखिल रमेश बेलागौडा हा गंभीर जखमी झाला आहे. आज वाल्मिकी जयंतीनिमित्त महाविद्यालयाला सुटी असल्याने हे दोघे विद्यार्थी दुचाकीवरून गोव्याला जातेवेळी जांबोटीजवळ समोरून येणाऱ्या कंटेनर वाहनाची धडक बसल्याने सदर अपघात घडला. खानापूरचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक, पीएसआय गिरीश एम यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. यानंतर झालेल्या अपघाताचा पंचनामा करून अपघाताचा गुन्हा खानापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला. जखमीला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तर मृतदेहावर जिल्हा इस्पितळात उत्तरही तपासणीसाठी धाडण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *