Sunday , July 26 2026
Breaking News

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीसह नदीत कोसळून दाम्पत्याचा मृत्यू

Spread the love

 

हुक्केरी : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीसह नदीत कोसळून दाम्पत्याचा मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्याच्या हुक्केरी तालुक्यातील नेगिनहाळ गावात ही दुर्दैवी घटना घडली. सुरेश बडिगेर (वय ५३) आणि जयश्री बडिगेर (वय ४५) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. घटप्रभा नदीवरील पूल ओलांडत असताना दुचाकी पलटी होऊन हा अपघात झाल्याची माहिती घटनास्थळावरून प्राप्त झाली आहे.

दरम्यान जयश्रीचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढला. सुरेशच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. पुलावर गतिरोधक नसणे हे अपघाताचे कारण असल्याचे स्थानिकांनी सांगितले. याप्रकरणी हुक्केरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *