बेळगावातील घटना
बेळगाव : रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या एका उद्योजकाचे दिवसाढवळ्या अपहरण झाल्याची घटना शहरात उघडकीस आल्यामुळे उद्योजकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नामांकित रियल इस्टेट व्यवसायिक व उद्योजक मदनकुमार भैरप्पनावर यांचे अपहरण झाल्याची घटना आज सकाळी माळमारुती पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली आहे.
बेळगाव शहराच्या कणबर्गी रस्त्यावरील श्रुती अपार्टमेंटनजीक महाराष्ट्र पासिंगच्या कार गाडीतून आलेल्या कांही अज्ञातांनी मदन कुमार त्यांचे जबरदस्तीने अपहरण केले आहे. यासंदर्भात त्यांच्या कुटुंबीयांनी माळमारुती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मदनकुमार भैरप्पनावर हे शहरातील मोठे उद्योजक व रियल इस्टेट व्यवसायिक आहेत. रियल इस्टेटसह श्रुती कन्स्ट्रक्शन, श्रुती लेआऊट आणि श्रुती अपार्टमेंटचे ते मालक आहेत. बेळगावच्या रिअल इस्टेट क्षेत्रात त्यांचे चांगले नांव आहे.
त्यांच्या अपहरणाचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी मारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी अपहरणकर्त्यांची शोध मोहीम हाती घेतली आहे. भैरप्पनावर त्यांचे अपहरण पैशासाठी झाले? की अन्य कांही कारणासाठी झाले? याचा शोध घेतला जात आहे.
Check Also
साठे प्रबोधिनीतर्फे काव्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन
Spread the love बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे …