Thursday , November 19 2026
Breaking News

केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी संकेश्वरमधील पूर
परिस्थितीची केली पाहणी

Spread the love

बेळगाव : केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी संकेश्वर मधील पूर परिस्थितीची पाहणी केली. गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस चालू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. नदी व नाले ओसंडून वाहत असून अनेक लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले असून मोठे नुकसान झाले आहे. त्याकरिता शनिवारी केपीसीसी कार्याध्यक्ष व आमदार सतीश जारकीहोळी तसेच बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी संकेश्वर येथे भेट देऊन तेथील पूर परिस्थितीची पाहणी केली. ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी सरकारने निधी मंजूर करावा असे यावेळी सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

शट्टीहळ्ळी–हत्तरगी मुख्य रस्त्यावर खडीचा ढीग; अपघाताचा धोका वाढला!

Spread the love  सलामवाडी येथील वळणावर वाहतुकीला अडथळा; खडी हटविण्याची नागरिकांची मागणी दड्डी : शट्टीहळ्ळी–हत्तरगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *