नेसरी येथील हर्षची कामगिरी
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड- नेसरी परिसरात महापूर म्हटले की अंगावर काटा उभा राहतो. यावेळी तर घटप्रभा नदिने पुराचा विक्रम केल्याने परिसरातील अनेक गावांचा विजपुरवठा खंडीत झाला होता. पण नेसरी ता. गडहिंग्लज विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सेवेचे ठायी तत्पर…विजवितरण म्हणत महापुरातही धाडस दाखवत पुरातून पोहत जाऊन विजपुरवठा सुरळीत केला.
नेसरी गावाजवळून घटप्रभा नदी वाहते. नेसरी उंचावर असल्याने पुराचा थेट फटका नेसरीला बसत नसला तरी नदिकाठावरून विज वाहिन्या गेल्या आहेत. त्याचे मोठे नुकसान होऊन नेसरी परिसरातील १२ गावांचा विजपुरवठा झाला होता. पण घटप्रभेला उच्चांकी महापूर आला असल्याने पुरातून पोहत जाऊन विज पुरवठा सुरळीत करण्यामध्ये अडचण होती. पण हे आवाहन नेसरी विज कंपनीच्या पथकाने स्विकारले.
हडलगे नवीन पुलाजवळील पुरात असलेल्या विद्युत खांबावर पुरातुन पोहत जाऊन तेगीनहाळ गावचे हर्षद विजय सुदर्शने याने विजपुरठा सुरळीत केला. टेक्नीशियन हर्षदचा पुरातून पोहताना व खांबावर चढतानाचा व्हीडीओ पहाताना अंगावर शहारे येतात. यामध्ये सचिन पाटील, भैरू देसाई, शाम देसाई, प्रशांत देसाई, मैनुद्दीन शेख, प्रकाश पोटे, आशय बागडी, हर्षद सुदर्शने यांनी पुराच्या पाण्यातून पोहत जाऊन परिसरातील हडलगे, डोणेवाडी, तारेवाडी, नेसरी आदी गावांचा विज पुरवठा सुरळीत केला. आणि आपली सेवा बजावली. याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.