Saturday , July 27 2024
Breaking News

बेळगाव ऑनलाईन मराठी साहित्य संमेलनात कवींची काव्य मैफिल रंगली बाहरदार …

Spread the love

बेळगाव : आपली काव्यरचना सादर करून त्यांनी सर्व कवीना दर्जेदार कविता लिहिण्याचे आव्हानेही केले. काव्य हे समाजमनाचे, वास्तवाचे, वेदनांचे, दुखांचे, आनंदाचे असते. त्या आपल्या भावना प्रतिभेच्या जोरावर ती व्यतीत केल्या पाहिजेत एक सुंदर काव्य निर्मिती करता आली पाहिजेत आणि कविला भावविश्व साकारता आले पाहिजेत. असे वणी यवतमाळ येथील कवी आनंद शेंडे यांनी कवी संमेलनाध्यक्षावरून बोलताना विचार व्यक्त केले.

यावेळी विशेष अतिथी म्हणून बेळगाव येथील प्रसिद्ध उद्योजक व मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव म्हणाले मराठी भाषा संस्कृती व अस्मितेसाठी साहित्य संमेलन गरज आहे. त्याचबरोबर मराठी सांस्कृतिक कार्यक्रमातून ही मराठी संस्कृतीला ऊर्जा मिळते यासाठी सदोदित कार्यक्रमांसाठी आम्ही मराठा मंदिर सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली.

साहित्य संमेलनाचे दुसरे पुष्प गुंफताना कविसंमेलनात बेळगाव सीमाभागासह, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबई व कोकण या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ७० कवींचा सहभाग होता. सर्व कवी कवित्रीने आशयपूर्ण सोबतच ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्या व माय मराठीचा गौरव तसेच आई पाऊस व समाजातील अनेक विषयावरती अनेक कवींनी आपल्या कविता सादर केल्या. त्याचबरोबर माय मराठी गुणगान गाणाऱ्या कविता सादर करताना अनेक कवींची दाद मिळाली.

यावेळी मुंबई प्रदेशाध्यक्ष हिरकणी राजश्री बोहरा, नाशिक जिल्हाध्यक्ष नवनाथ गायकर, बेळगाव मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्य अध्यक्ष रवींद्र पाटील हे मान्यवर उपस्थित होते.

संमेलन यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महादेव चौगुले, बेळगाव जिल्हा अध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी. बी. पाटील, रणजीत चौगुले, एम. वाय. घाडी, संजय गुरव, उपाध्यक्षा अरुणा गोजे – पाटील, स्मिता चिंचणीकर, सविता वेसने, नेत्रा मेणसे परिश्रम घेतले.

कवी संमेलनाच्या माध्यमातून नवोदित कवी साहित्यिकांना आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदव्दारे सशक्त ऑनलाईन साहित्यिक विचारपीठ मिळवून दिले. सर्व पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त करून संमेलनाची रंगतदार पद्धतीने सांगता करण्यात आली.

कवी संमेलनाचे सूत्रसंचालन रोशनी हुंद्रे व प्राध्यापिका मनीषा नाडगौडा यांनी केले तर जिल्हा उपाध्यक्ष डी. बी. पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *