बेळगाव : लाकडे गोळा करून संघर्ष करत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावणारी मीराबाई चानु हिला सरकारकडून मदत मिळतच आहे. बेळगावातील एका फार्मसी चालवणाऱ्या युवकाने देखील मदत देऊ करत अभिनंदन केले आहे.
बेळगाव येथील प्रसाद होमिओफार्माचे
प्रसाद घाडी यांनी पंतप्रधान कार्यालयाद्वारे पाच हजारांची मदत देऊन मीराबाई चानू हिचे अभिनंदन केले आहे. भारतात गरिबीतून संघर्षातून आंतरराष्ट्रीय पदक मिळवणाऱ्या खेळाडूंची संख्या अगणित आहे मात्र छोटीशी का होईना ऑलम्पिक पदक मिळवलेल्या खेळाडूंना मदत देऊन खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम घाडी यांनी केलं आहे.