खानापूर (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री व विरोध पक्षनेते सिद्धरामय्या यांनी मंगळवारी खानापूर तालुक्याचा दुष्काळ पाहणी दौरा केला.
यावेळी त्यानी दुर्गानगर वसाहत, मारूतीनगर, मलप्रभा नदीपुलाचा पाहणी दौरा केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, गरीब कुटुंबाचे संसार उघड्यावर पडले आहेत. तेव्हा राज्य सरकारने अशा कुटुंबाना ५ लाखाची नुकसान भरपाई द्यावी. त्यांना पूर्वपदावर येण्यासाठी सर्वोतोपरीने मदत करावी, असे सांगून मलप्रभा नदीच्या पुलाची पाहणी करताना ते म्हणाले की, मलप्रभा नदीवरील पुलांची बांधणी चुकीची आहे. त्यामुळे खानापूर शहरवासीयांना संकटाशी सामना करावा लागत आहे. यासाठी प्रोटेक्शन वाल होणे गरजचे आहे. अन्यथा वारंवार पाण्याच्या धोक्याशी खानापूर शहरवासीयांना सामना करावा लागणार आहे.
मलप्रभा नदीला जवळपास १२ पुल वजा बंधारे होणे गरजेचे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे खानापूर शहराला मलप्रभा नदी लाभली आहे. मात्र शहराला पाण्याच्या पाण्याची म्हणावी तशी सोय झाली नाही.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाजप सरकार भ्रष्ट सरकार आहे. त्यामुळे येत्या २०२३ च्या होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय नक्कीच होणार आहे. असे उत्तर पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना दिले.
पत्रकार परिषदेला माजी मंत्री विद्यमान आमदार सतीश जारकिहोळी, आमदार डॉ. अंजली निंबाळकर, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, माजी आमदार वीरकुमार पाटील व काँग्रेसचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते.