खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायत कार्यालयाच्या आवारात 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन रविवारी उत्साहाने साजरा करण्यात आला.
कोविड-19चे नियम पाळत नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांच्या हस्ते अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा झेंडा फडकविण्यात आला.
प्रारंभी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी स्थायी कमिटी अध्यक्ष लक्ष्मण मादार, नगरसेवक नारायण मयेकर, नारायण ओगले, प्रकाश बैलूरकर आदी मान्यवरांच्या हस्ते फोटो पुजन करण्यात आले.
कार्यक्रमाला उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, नगरसेवक नारायण मयेकर, विनायक कलाल, विनोद पाटील, प्रकाश बैलुरकर, आपय्या कोडोळी, नारायण ओगले, हणमंत पुजार, तोहिद हुसेनसाब, महमद रफिक वारेमनी, मेघा कुंदरगी, शोभा गावडे, मिनाक्षी बैलूरकर, लता पाटील, जया बुतकी, राजश्री तोपिनकट्टी, फातिमा बेपारी, सहेरा सनदी, आदी नगरसेवक उपस्थित होते. यावेळी नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …