बेळगाव : राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई येत्या शनिवार दि. 25 व रविवार दि. 26 सप्टेंबर असे सलग दोन दिवस बेळगाव दौर्यावर येणार असून ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. बेळगाव महापालिका निवडणुकीमध्ये विजय झालेल्या भाजपच्या उमेदवारांनी नुकतीच बेंगलोर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण लवकरच बेळगाव दौर्यावर येत असल्याचे सांगितले होते.
त्यानुसार येत्या शनिवार व रविवारी त्यांचा बेळगाव दौरा निश्चित झाला आहे. या दौर्यादरम्यान आपण बेळगावच्या विकासासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बसवराज बोम्माई दुसर्यांदा बेळगाव दौर्यावर येत आहेत.
बेळगावच्या विकासासंदर्भात ते महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने बेळगाव उत्तरचे आमदार अॅड. अनिल बेनके आणि दक्षिणचे आमदार अभय पाटील मुख्यमंत्र्यांसमोर कोणत्या विकास योजनांचा प्रस्ताव ठेवतात याकडे शहरवासीयांचे लक्ष असणार आहे.
Check Also
बेळगावात सी. टी. रवींच्या निषेधार्थ काँग्रेसचे तीव्र आंदोलन; पुतळा जाळला
Spread the love बेळगाव : महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य …