माजी जिल्हा प्रांतपाल इस्माईल पटेल यांची उपस्थिती : ऑक्सिजन कॉन्स्टेटरचे उद्घाटन
निपाणी : निपाणी रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा सोशल डिस्टन्सनुसार बुधवारी (ता. 22) सायंकाळी 5 वाजता येथील रोटरी हॉलमध्ये होणार आहे. सातारा येथील माजी जिल्हा रोटरी प्रांतपाल इस्माईल पटेल यांच्या हस्ते बेळगाव जिल्हा रोटरीचे माजी सहाय्यक प्रांतपाल विक्रम जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
रोटरी क्लब अध्यक्ष म्हणून सोमनाथ परमने सेक्रेटरी म्हणून विनय जैस्वाल, खजिनदार म्हणून गजेंद्र तारळे हे पदग्रहण करणार आहेत. यावेळी रोटरी क्लब उपाध्यक्ष अमर बागेवाडी, सुजय शहा, कम्युनिटी सर्विस संचालक सुहास परमणे, क्लास सर्व्हिस संचालक सुबोध शहा, युथ सर्विस संचालक सचिन देशमाने, इंटरनॅशनल सर्विस संचालक राजेश पाटील, व्होकेशनल सर्विस संचालक आनंद सोलापूरकर, मेंबरशिप डिलिव्हरी कमिटी चेअरमन वैशाली पाटील, पल्स पोलिओ कमिटीचे चेअरमन श्रेनिक मेहता हे पदग्रहण करणार आहेत. या कार्यक्रमात रोटरी हेल्थ सेंटर अंतर्गत ऑक्सिजन कॉन्सटेटर मशीनचे उद्घाटन होणार आहे. शहरात अत्यावश्यक सेवेसाठी हे मशीन वापरले जाणार असल्याची माहिती रोटरी पदाधिकार्यांनी दिली.
Check Also
निपाणीत पारंपरिक पद्धतीने विजयादशमी
Spread the love आमराई रेणुका मंदिरांत गर्दी; शमी पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम निपाणी (वार्ता) : …