Friday , December 27 2024
Breaking News

भटक्या कुत्र्यांचा बकर्‍यांच्या कळपावर हल्ला : 6 बकरी ठार

Spread the love

बेळगाव : शाळेच्या आवारात बसवलेल्या बकर्‍यांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला करून 6 बकर्‍यांना ठार केले. या हल्ल्यात 3 बकरी गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना शिवबसव नगरातील कन्नड शाळेच्या आवारात काल रात्री घडली.
बेळगाव तालुक्यातील मुतगा गावचे मेंढपाळ नरसू रायप्पा कुंपी आणि अन्य 7-8 मेंढपाळांच्या सुमारे 400 बकर्‍यांचा कळप मंगळवारी रात्री शिवबसव नगरातील कन्नड शाळेच्या आवारात बसवण्यात आला होता. मध्यरात्रीनंतर अचानक सुमारे 20हून अधिक भटक्या कुत्र्यांच्या समूहाने बकर्‍यांवर हल्ला चढविला. कुत्र्यांनी 6 बकरी फाडून ठार केली. तर 3 बकरी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
यासंदर्भात माहिती देताना मेंढपाळ निंगाप्पा मल्लप्पा मल्लूगोळ यांनी सांगितले की, मंगळवारी मध्यरात्रीनंतर सुमारे 2.30 ते 3.00 वा. च्या सुमारास अचानक भटक्या कुत्र्यांच्या कळपाने बकर्‍यांवर हल्ला चढवला. यात 6 बकरी मरण पावली तर 3 बकरी गंभीर जखमी झाली आहेत. यामुळे मेंढपाळांचे सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, बकर्‍यांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून 6 बकरी ठार केल्याने मेंढपाळ आर्थिक संकट सापडले असून, सरकारने याबद्दल भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतन स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये ऐनवेळी बदल

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेचे स्नेहसंमेलन 27 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *