Wednesday , May 29 2024
Breaking News

पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Spread the love

बेळगाव : अथणी ग्रामीण पाणीपुरवठा आणि निर्मल्य खात्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता आणि कार्यालय व्यवस्थापक अशा दोघा जणांना लाच स्वीकारताना भ्रष्टाचार निर्मूलन पथकाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे.
अथणी ग्रामीणचे सहाय्यक कार्यकारी अभियंता राजेंद्र इंद्रप्पा वर्णाकर आणि कार्यालय व्यवस्थापक दीपक कृष्णाजी कुलकर्णी अशी एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या अधिकार्‍यांची नांवे आहेत. एका ठेकेदाराकडून 68 हजार रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकार्‍यांनी या उभयतांना रंगेहात पकडून अटक केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
पाणी पुरवठा खात्याच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामाचे कंत्राट मिळवून देण्यासाठी सदर अधिकार्‍यांनी बेळगावच्या एका ठेकेदाराकडे कंत्राटाच्या 3 टक्के रकमेची मागणी केली होती.
यासंदर्भात ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार नोंदविली होती. या तक्रारीची दखल घेऊन एसीबीच्या अधिकार्‍यांनी सापळा रचून वर्णाकर व कुलकर्णी यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
एसीबीचे जिल्हा पोलीस प्रमुख बी. एस. न्यामगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस प्रमुख करूनाकर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली इन्स्पेक्टर गळाद, अडिवेश गुडीगोप्प, सुनील कुमार आणि त्यांच्या सहकारी कर्मचार्‍यांनी उपयुक्त धाडीची कारवाई केली.

About Belgaum Varta

Check Also

हलगा-मच्छे बायपास रस्त्याची स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली

Spread the love  बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *