Wednesday , December 4 2024
Breaking News

गणेशोत्सवानंतर आता वेध देवीच्या आगमनाचे!

Spread the love

मूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारांची लगबग : मंडळांसह घरोघरी नवरात्र उत्सवाची तयारी सुरू
निपाणी : सलग दोन वर्षांपासून कोरोना संकटातच गणेश उत्सव साजरा केला जात आहे. त्यानंतर आता नवरात्र उत्सव वावरही कोरोणाचे संकट असून या परिस्थितीतही आता गणेशोत्सवानंतर निपाणी परिसरातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ आणि घरोघरी उत्सवाचे वेध लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची देवीची मूर्ती बनविण्याची लगबग सुरू असून मंडळामध्ये देवीच्या प्रतिष्ठापने बाबत बैठका होत आहेत.
सुंदर नक्षीकाम, डोळ्यांच्या सुबक आखणीमुळे गणेशमूर्तीसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या मूर्तिकार आता नवरात्र उत्सवाच्या तयारीला लागले आहेत.
कानगला, बुदलमुख परिसरातील कार्यशाळांमध्ये देवींच्या मूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारांची लगबग वाढली असून या परिसरातील गणेशमूर्ती ज्याप्रमाणे प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे नवरात्र उत्सवासाठी लागणार्‍या देवीच्या मूर्तीना देखील तेवढीच मागणी आहे.
गणेशमूर्ती प्रमाणेच देवींच्या विविध प्रकारच्या मूर्ती कल्पकतेने साकारल्या जात आहेत. अनेक मूर्तिकारांकडे गणराय बरोबरच देवीच्या मूर्ती तयार करण्याची कला आहे त्याचा उपयोग करून घेऊन वर्षभर गणेश आणि देवीची मूर्ती हे मूर्तिकार बनवित आहेत.
सध्या परिसरामध्ये दोन फुटांपासून 4 ते 5 फुटांपर्यंत देवीच्या मूर्ती बनवल्या जात आहेत.
साधारण 5 हजारांपासून 8 ते 10 हजार रुपयांपर्यंत त्यांची विक्री होलसेलमध्ये होते. सध्या मूर्तिकारांनी बनवलेल्या देवीच्या मूर्ती, कोल्हापूर, कागल, सांगली, जयसिंगपूर, बेळगाव, निपाणी, मुरगुड, इचलकरंजी परिसरात रवाना होणार आहेत आहेत.
नवरात्र उत्सवासाठी लागणाया देवीच्या मूर्तीना देखील गणेश मूर्ती एवढीच मागणी आहे. देवीच्या मूर्ती तयार करताना जास्त मेहनत करावी लागते.
देवीचे 8 हात, मोकळे केस, साडीवरील नक्षीकाम करताना गणेश मूर्तीपेक्षा देवीच्या मूर्तीचे काम करताना वेळ जास्त लागतो. तसेच कलाकुसरीचे काम अधिक काळजीपूर्वक करावे लागत असल्याने एक मूर्ती घडविण्यासाठी कारागिरांची कलात्मक दृष्टी आणि संयम याची खरी परीक्षा असते.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ साहित्यिक प्रा.अजित सगरे यांचे निधन

Spread the love  निपाणी (वार्ता) : सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात सतत कार्यरत असणारे निपाणी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *