निपाणी : शहर आणि ग्रामीण परिसरातील सोयाबीन पिकाला विक्रम दर मिळत असलेल्या शेतकरी वर्गाला एका रात्रीत व्यापारी वर्गाने झटका दिला. प्रति किलो 85 रूपयांपर्यत असणारा दर 50 रूपये किलोवर आल्याने शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शेतकर्यांची नाराजी व्यक्त होत आहे. एका रात्रीत तब्बल 28 ते 30 रूपये दर कमी झाल्याने शेतकरी शेतकरी वर्गाने सोयाबीन न विकण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी वर्गाची ही मोठी फसवणूक असल्याची चर्चा परिसरात होत आहे. निपाणी परिसरातील व्यापारी पिक म्हणजे तंबाखू, पण बेरभवशाचे आणि जागतीक आरोग्य संघटनेकडून होत असलेला बंदीचा फटका लक्षात घेवून या पिकाकडे दुर्लक्ष करीत या भागातील शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळला आहे. यावर्षी सुरूवातीपासून चांगला दर मिळत असल्याने शेतकरी वर्गाच्या आनंद झाला. मात्र अचानक 50 रूपयावर दर निघाला असल्याचे व्यापारी वर्गाने सांगितल्याने शेतकरी वर्गाला तोटा झाला आहे. सध्या 50 ते 55 रूपयांवर दर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हबकला असून खाजगीरित्या सोयाबीन घेणार्या व्यापार्यांचा शेतकर्यांना लुटण्याचा प्रकार असल्याची शेतकरी वर्गात चर्चा आहे. व्यापारी वर्गाची ही एक चाल असून शेतकरी वर्गाने सोयाबीन विकू नये वाळवून ठेवावे असे आवाहन केले जात आहे.
16 सप्टेंबरच्या दरम्यान सोयाबीनचा 8300 ते 8800 रुपये प्रतिटन असणारा दर 21 सप्टेंबर 2021 ला 6300 ते 6700 रुपये टनाच्या घरात जातो म्हणजेच शेतकर्याला हवाहवासा असणारा सोयाबीनचा दर हवेतच विरून गेल्याचे चित्र निपाणी परिसरात पाहावयास मिळत आहे. शिवाय शेतकर्याच्या सर्व अशा अपेक्षांवर पाणी फिरण्याचे काम या हवेने केले आहे. नेहमी हवा आणि दर स्वतःच्या मर्जीप्रमाणे ठरवणारे व्यापारी हवेत असल्याचे आणि शेतकरी खाली कोसळल्याचे चित्र दिसत आहे. हवेत आणि वजनात मारताना कमी की आता दरातही मारू लागल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.
Check Also
शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे मागे घ्या
Spread the love राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत शेंडूरमध्ये बैठक निपाणी (वार्ता) : सरकारने शेतकऱ्यांच्या …