बेळगाव : श्री घुमटमाळ मारुती मंदिर पब्लिक ट्रस्ट, हिंदवाडीच्या अध्यक्षपदी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री. चंद्रकांत बांडगी यांची आगामी वर्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मावळते अध्यक्ष अनंत लाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी कुलदीप भेकणे यांची तर चिटणीसपदी प्रकाश माहेश्वरी यांची निवड झाली आहे. याप्रसंगी सर्वश्री गोपाळराव बिर्जे, रघुनाथ बांडगी, नेताजीराव जाधव व सुनिल चौगुले यांची अभिनंदनपर भाषणे झाली.
अनंत लाड यांनी गेल्या वर्षभराच्या कारकिर्दीत कोरोनाची परिस्थिती असून सुद्धा अनेक देणगीदारांच्या सहकार्याने पूजारी निवासाची उभारणी केली तसेच औदुंबरा शेजारी कट्टा बांधणी आणि इतर उपक्रमही त्यांनी राबवले त्याबद्दल या बैठकीत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. श्री. चंद्रकांत बांडगी हे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर असून युनियन जिमखाना बेळगावचे विद्यमान अध्यक्ष आहेत. कुलदीप भेकणे हे उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. प्रकाश माहेश्वरी हे गेल्या अनेक वर्षांपासून हनुमान भक्त असून विविध सामाजिक कार्यात नेहमी भाग घेतात.
Check Also
साठे प्रबोधिनीतर्फे काव्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन
Spread the love बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे …