खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जांबोटीपासून चोर्लापर्यंतच्या महामार्गावर यंदाच्या मुसळधार पावसामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे जांबोटीपासून ते चोर्लापर्यंत जाणार्या दुचाकी, चारचाकी वाहनांना वाहन चालविणे तारेवरची कसरत होत आहे.
अशातच खड्डा चुकविण्याच्या नादात अपघाताला निमंत्रण होत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहने चालविणे धोक्याचे झाले आहे. मागील वेळी माती टाकून खड्डे बुजविण्याचे नाटक संबंधित खात्याच्या अधिकार्यांनी केले होते. परंतु काही दिवसातच माती वाहून गेली आणि येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे लोकप्रतिनिधीनी पाहणे गरजेचे आहे. या मार्गावर जनतेची धावपळ किती धोक्याची आहे. एखाद्या अपघाताने मृत्यू ओढाविला तरच लोकप्रतिनिधींना जाग येणार का असा प्रश्न जांबोटी भागातील जनतेतून विचारला जात आहे.
Check Also
खानापूर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणूक २७ रोजी; दोन्ही पदे सामान्य महिलांसाठी राखीव
Spread the love खानापूर : खानापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा …