दीड किलो गांजा जप्त : यरनाळ जवळ कारवाई
निपाणी : गांजा विक्रीसाठी नेणार्या दोघांना निपाणी पोलिसांनी बुधवारी अटक केली. सोहेल शब्बीर देसाई (वय 26, रा. बादलवाले प्लॉट, निपाणी), हमीद सलीम शेख (वय 21, रा. शिवाजीनगर, निपाणी) अशी अटक केलेल्या संशयितांची नांवे आहेत. संशयितांकडून पोलिसांनी दीड किलो गांजा व मुद्देमाल जप्त केला.
घटनेची नोंद निपाणी शहर पोलिस स्थानकात झाली पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, बुधवारी दुपारी शहरातील दोघे जण यरनाळ गावच्या बाजूला गांजा विक्रीसाठी नेणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दुपारी मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी, पोलिस उपनिरीक्षक कृष्णवेणी गर्लहोसूर यांनी सहकार्यांसह सापळा रचून गांजा विक्रीसाठी जाणार्या दोन आरोपींना अटक केली. यावेळी त्यांच्याकडे सुमारे दीड किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी संशयित आरोपींना पोलिस स्थानकात आणून त्यांची चौकशी केली.
रात्री उशीरा देसाई व शेख या दोघा संशयित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिस उपनिरीक्षक कृष्णवेणी गर्लहोसूर यांनी सांगितले. मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी, पोलिस उपनिरीक्षक कृष्णवेणी गर्लहोसूर यांच्या नेतृत्वाखाली शेखर असोदे, उदय कांबळे, बसवराज नावी यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी कारवाईत सहभाग घेतला.
यावेळी तहसीलदार डॉ. मोहन भस्मे, पंचायत विकास अधिकारी ए. एस. माळी यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
——-
दोन वर्षानंतर पहिली कारवाई
दोन वर्षांपूर्वी निपाणी शहरात विक्रीसाठी आलेल्या अल्पवयीन युवकांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर शहर आणि ग्रामीण भागात अशा प्रकारचा बेकायदा व्यवसाय सुरू असताना एकही आरोपी हाती लागणार नव्हता. तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा ही कारवाई सुरू झाल्याने गांजा विक्री करणार्या व्यवसायकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta