बेळगाव : राज्यात पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ बेळगावातील उर्दू-हिंदी पत्रकार संघटनेतर्फे आज बुधवारी जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले.
बेळगावातील उर्दू-हिंदी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष इक्बाल जकाती यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर केले गेले. जिल्हाधिकार्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या संदर्भात बोलताना अध्यक्ष इक्बाल जकाती यांनी पत्रकारिता ही लोकशाहीच्या आधारस्तंभांपैकी एक आहे. मात्र आपल्या राज्यात पत्रकारांवर हल्ले होत आहेत आणि त्याकडे कोणीही लक्ष देत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे असे सांगून पत्रकारांवरील हल्ले त्वरित रोखले जावेत, अशी मागणी केली. याप्रसंगी एस. एम. मोकाशी, बी. एम. सय्यद, इम्रान एन. आदींसह उर्दू -हिंदी पत्रकार संघटनेचे अन्य सदस्य उपस्थित होते.
Check Also
आम. असिफ सेठ यांची विविध वसतिगृहांना भेट
Spread the love बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज …