Sunday , December 22 2024
Breaking News

मुलांची विक्री करणार्‍या टोळीला बंगळूरात अटक

Spread the love

12 मुलांचे संरक्षण; तीन महिलांसह पाच जण ताब्यात
बंगळूर : येथील दक्षिण विभाग पोलिसांनी अपत्यांची विक्री करणार्‍या तीन महिलांसह पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. आनखी कांही आरोपी फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
असहाय्य पालकांकडून नवजात अर्भके विकत घेऊन मुले नसलेल्या दांपत्याना लाखो रुपये किमतीला त्यांची विक्री करीत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कांही मुलांची चोरी किंवा त्यांचे अपहरण करून त्यांची विक्री करण्यात आल्याचेही चौकशीतून समोर आले आहे.
महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील रंजनादेवी दास (वय 32), एमएस पाळ्यची देवी (वय 26), मल्लसंद्रची धनलक्ष्मी (वय 30), पत्रीगुप्पेचा महेश कुमार (वय 50) तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील जनार्दन (वय 33) हे टोळीतील आरोपी आहेत.
टोळीच्या जाळ्यात अडकलेली 12 मुले व त्यांचे पालन, पोषण करणारे पालक यांचा शोध घेऊन त्यांना बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आल्याचे, डीसीपी हरीश पांडे यांनी सांगितले. या टोळीतील इतर आरोपी व त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या आनखी कांही मुलांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.
गेल्या पाच एप्रील रोजी रोजी विल्सन गार्डनची देवी नावाची महिला मुंबईहून मुले आणून त्यांची विक्री करीत असल्याच्या माहितीच्या आधारे शोध मोहीम राबविण्यात आली. मॅजेस्टीक रेल्वे स्थानकावर मुलांची विक्री करण्यास आलेल्या रंजनाला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता यामागे मोठे रॅकेट असल्याचे उघड झाले. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे मुलांची विक्री करणार्‍या गँगचा शोध घेण्यात आला.
पांडे म्हणाले की, आरोपींनी अपत्यहीन जोडप्यांना गाठून मुलांची त्यांना विक्री करीत होते. अशा प्रकारे विकलेल्या मुलांचा व त्यांना विकत घेतलेल्या दांपत्यांचाही शोध घेण्यात येत आहे. अपत्यहीन जोडप्यांना लक्ष्य करणार्‍या या टोळीने चोरलेल्या किंवा असहाय्य पालकांकडून विकत घेतलेल्या आपत्यांची भाडोत्री आईच्या माध्यमातून लाखो रुपये किमतीला विक्री केली असल्याचे उघड झाले आहे.
अनेक मुलांचे अपहरण करून त्यांची विक्री करण्यात येत असल्याचेही आता उघड झाले आहे. अनेक वर्षापासून हा धंदा चालत असल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली आहे. मुले विकत घेतलेल्या दांपत्यांचाही शोध घेण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

अभियंता अतुलकडून निकीता मागत होती 80 हजार रुपये मेंटेनन्स

Spread the love  बेंगळुरू : अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया हिच्यासह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *