Wednesday , April 17 2024
Breaking News

बडाल अंकलगी येथे घर कोसळून सात जण ठार

Spread the love

बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावात पाच जण घर कोसळून जागीच ठार झाले आहेत तर दोघांचा उपचाराला घेऊन जाताना वाटेत मृत्यू झाला. सायंकाळी साडे सातच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या बडाल अंकलगी गावातील भीमाप्पा खनगावी यांचे घर कोसळले. त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आणि इतर तीन जण गंभीर जखमी झाले होते त्यात दोघा जखमींना हिरेबागरवाडी येथील इस्पितळात उपचारासाठी नेताना मृत्यू झाला.
सात मयतापैकी खनगावी कुटुंबातील सहा जण आणि शेजारच्या कुटुंबातील एक असे सात जण या घटनेत दगावले आहेत.
हिरेबागेवाडी पोलिसांनी व अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. पोलीस निरीक्षक विजय शिंनूर यांच्या नेतृत्वाखाली बचावकार्य केले. बुधवारी झालेल्या पावसाने घर कोसळले असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
गंगाव्वा भिमाप्पा खनगावी (वय 50), सत्यव्वा अर्जुन खनगावी (वय 45), पूजा अर्जुन खनगावी (वय 8), सविता भिमाप्पा खनगावी (वय 28), काशव्वा विठ्ठल कोळेपन्नावर (वय 08), लक्ष्मी हणमंत खनगावी (वय 15) आणि अर्जुन हणमंत खनगावी (वय 45) सर्वजण राहणार बडाल अंकलगीचे रहिवाशी अशी मयतांची नावे असून आहेत.

About Belgaum Varta

Check Also

अम्युजमेंट रोबोटिक बटरफ्लाय व एनिमल्स प्रदर्शनाचे उद्घाटन

Spread the love  बेळगाव : “कर्नाटकाच्या विविध भागात अशा प्रकारची प्रदर्शने आयोजित करून बेळगावात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *