Tuesday , April 23 2024
Breaking News

खानापूरातील युवक नदीत बुडाला; मलिकवाड येथील घटना

Spread the love

मलिकवाड (ता. चिक्कोडी) : खानापूर तालुक्यातील हारूरी येथील युवक दुधगंगा नदीत बुडाला. मलिकवाड (ता. चिक्कोडी) येथे बुधवारी (दि. ६) रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. राहुल बळीराम शिवटणकर (वय २६) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. सदलगा पोलिस व अग्निशामक दलाचे जवान नदीत बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेत होते. आपल्या काकाकडे आल्यावर ही घटना घडली असून नदीकाठावर लोकांची गर्दी झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, राहुल याचे दत्तवाड येथील काका अनंत शिवटणकर यांनी चंदूर (ता. चिक्कोडी) येथे काम घेतले होते. राहुल हा फरशी कटिंगचे काम करत होता. त्यासाठी गेल्या चार दिवसांपूर्वी तो काकाकडे आला होता. दसऱ्यानिमित्त काकासोबत अंथरूण धुण्यासाठी मलिकवाड येथे दुधगंगा नदीवर गेला. अंथरूण धुवून झाल्यानंतर काका परत गावाकडे आले आणि तो आपल्या मित्रासोबत पोहायला लागला. अचानक पोहताना पाण्याच्या प्रवाहात पुलापलिकडील भोवऱ्यात अडकल्याने पाण्यात गुदमरून बुडाला. मात्र उपस्थित असलेल्या नागरिकांपैकी कोणीच त्याला वाचवू शकले नाही. राहुल कालांतराने पाण्यात दिसेनासा झाला.

या घटनेची माहिती समजताच सदलगा पोलिस आणि सदलगा अग्निशमन दलाचे जवान एस. एल. हुगार, एम. एन. हणमंत, एच. आर. हेगाडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. राहुलचा तीन-चार तास शोध घेतला असता सायंकाळी उशिरापर्यंत सापडला नाही. कुरुंदवाड पोलिसही घटनास्थळी भेट देऊन पहाणी करून गेले. राहुल शिवटणकरच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. बुधवारी सायंकाळी बेळगाव येथून एनडीआरएफ बचाव पथक दाखल झाले. उशिरापर्यंत राहुल याचा शोध घेण्यात येत होता. या घटनेची चर्चा दिवसभर चिक्कोडी, निपाणी, शिरोळ तालुक्यात सुरू होती.

About Belgaum Varta

Check Also

शेतकरी विरोधी भाजपला सत्तेपासून दूर ठेवा : डॉ. अंजलीताई निंबाळकर

Spread the love  खानापूर : आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देणारे केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *