उपचारासाठी दिली 95 हजारांची देणगी
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड (ता. चंदगड) येथील आजारी मित्र राजू होंगल यांना कोवाड व्यापारी संघटना यांच्याकडून 95,250 रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
कोवाड बाझारपेठेत राजु होंगल यांचे राजश्री सायकल मार्ट हे सायकल रिपेयरींगचे दुकान आहे. कोरोना व महापुर यातून सावरण्याआधीच पोटाच्या दुर्धर आजाराने राजूला ग्रासले. गेले दोन महिने ते हॉस्पिटलमध्ये जिवनमरणाची लढाई लढत होते. ज्यावेळी ही बातमी कोवाड बाझारपेठेत समजली. त्यावेळी मनमिळावू व साधाभोळा राजू यातून लवकर बरा झाला पाहिजेत अशी प्रत्येकाची भावना निर्माण झाली. त्याच्यासाठी आपण काहीतरी मदत केली पाहिजेत असे सगळ्यांना वाटत होते. कोवाड व्यापारी संघटनेच्या वतीने तसे मदतीचे अवाहन केले व दोन चार दिवसात बहुतांशी सर्व व्यापार्यांनी व काही मित्रमंडळीनी मिळून 95,250 रूपयांचा मदतनिधी जमा केला. तो आज राजु व त्यांच्या आईंच्याकडे देण्यात आला. कोवाड व्यापारी संघटनेची ताकद आज राजू यांच्यापाठिशी खंबीरपणे उभी राहिली व त्यांना जगण्याची उभारी देवून गेली. संघटनेची एकजुट व सर्वांनी एकमेकांना मदत करणे, एखाद्याला त्याच्या अडीअडचणीत मदत करणे यासाठी कोवाड व्यापारी संघटना नेहमीच तत्पर आहे. यापुर्वी सुद्धा अशाप्रकारे मदतनिधी जमा करून आजारी, अनाथ व गरजु लोकांच्या पाठीशी संघटना उभी राहिलेली आहे. मदतीसाठीच्या सोशल मेडीयावरील एका मेसेजवर सर्वजनानी कोणताही दुजाभाव न ठेवता एकत्र येऊन ही खुप मोठी मदत दिली. ही अभिमानास्पद बाब आहे. संघटनेची एकता अशीच अखंडीत राहु देत व या सर्वांच्या सहकार्याबद्दल कोवाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम व सर्व पदाधिकार्यांनी आभार मानले.
कोवाड व्यापारी संघटनेच्या या कार्याची खरचं सर्व समाजाने दखल घेणे गरजेचे आहे.
Check Also
हसुर सासगिरीच्या शांताबाई जटा मुक्त होऊन मतदानाला
Spread the love गडहिंग्लज : गडहिंग्लज अनिसच्या कार्यकर्त्यांनी शांताबाईच्या मनातील भीती व अंधश्रद्धेची जळमटे दूर …